सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची आवड निवडचा अंदाज येतो- डॉ. प्रा.सलाम सर
नगर - विद्यालयातील विद्यार्थी वर्षभर मोठ्या आतुरतेने शाळेचे स्नेह संमेलनाची वाट पाहत असते. त्यांना याद्वारे आपल्या आवडीच्या गोष्टी स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करता येते. यामुळे पालकांना व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या आवड निवडचा अंदाज येतो. व मुलांवर संस्कार करुन त्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. लहान वयात मुलांच्या पाया रचला जातो. आजची मुले उद्याचे भविष्य आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास सक्षम समाज घडणार आहे.असे प्रतिपादन मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केले.
मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील मौलाना आझाद उर्दु गर्लस हायस्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन माऊली संकुल येथे संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाहक डॉ. प्रा. अब्दुस सलाम सर, शेख लाला, उपसचिव अजीज जनाब, विश्वस्त नसीर शेख, शरफुद्दीन शेख, सलीम शेख ,रशिद शेख,हसीब शेख, मतीन शेख,फरीदा भाभी,शबाना आपा, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद, मुख्याध्यापक नौशाद सैय्यद,महेनाज बाजी, असलम पटेल, फरीदा जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थ्यांनी संविधानामध्ये समाजाच्या हक्कासाठी असणाऱ्या बाबींचा उल्लेख संविधान जागर नाटकातून सांगितले. मंगल पांडे यांच्या फाशीची संपूर्ण माहिती ही नाटक द्वारे देण्यात आली. तसेच भारताच्या प्राचीन इतिहास ही नाटकातून सांगण्यात आला. या व्यतिरिक्त मुशायरा, कव्वाली, कोळी डान्स, पाण्याचे महत्व, झाडांचे महत्त्व व अशा अनेक शैक्षणिक साहित्यिक व सामाजिक विषयांची नाटके सादर करून पालक व विद्यार्थांया मध्ये जनजागृती करण्यात आली. आपल्या मुलांमधील कलागुणांना पाहून पालकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहार अंजूम यांनी केले. तर आभार अंजुम खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाजेमा जुल्फेकार, नाहीद, रफत,नाजेमा इकबाल,अफशा, मिनाज शेख, खुतेजा बाजी, सदफ, मलेका बाजी, सिदरा, यास्मिन शेख आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरपूर परिश्रम घेतले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com