Top News

नगरमध्ये प्रथमच सिनेगीत गायकांना मिळणार पुरस्कार

शुक्रवारी माउली सभागृह येथे इलिस्टा प्रस्तुत बेस्ट सिंगर अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन


नगरमध्ये प्रथमच सिनेगीत गायकांना मिळणार पुरस्कार


नगर । दर्शक :-



नगर मधून सिनेगीत गायन क्षेत्रात अनेक कलाकार मोठे नाव कमवत आहेत.

तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अनेक मान्यवर व्यावसायिक प्रथितयश गायक बनले आहेत त्यांच्या त्यांच्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एका शानदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर मध्ये प्रथमच अशा शानदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन होत आहे.



शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता माउली सभागृह येथे इलिस्टा प्रस्तुत बेस्ट सिंगर अवॉर्ड सोहळा कुबेर मार्केट तसेच इझी इलेक्ट्रॉनिक्स , नगरी व्हिलेज, सायंतारा, बांगडीवाला युनीट्री, ब्लॉसम गिफ्ट्स बॉक्सेस, बिग एफ. एम. आदी प्रयोजकांच्या योगदानातून आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती कुबेर पतके यांनी दिली आहे.



नगरमधील वैद्यकीय, अभियांत्रिकी, बँकिंग, फायनान्स, शैक्षणिक, व्यापार तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक आपला व्यवसाय सांभाळत सिने गायनाची कला जोपासत आहेत. त्यांच्या कलागुणांचे कौतुक व्हावे तसेच त्यांना प्रोत्साहन म्हणून या मैफिलीचे आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा मध्ये पुणे मुंबई संभाजीनगर येथून वादक बोलाविण्यात आले आहे, 


म्युझिक कंडक्टर निलेश सोज्वाळ आणि एडविन पेरीपदम हे आहेत,हे सर्व कलाकार आपल्या गीतांचे सादरीकरण या लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्ट मध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा च्या साथीने करणार आहेत. कार्यक्रम वेळेवर ५ वाजता सुरु होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. माउली सभागृहात पहिल्या चार रांगा निमंत्रित आणि प्रयोजकांसाठी राखीव असून रसिक प्रेक्षकांनी वेळेअगोदर सभागृहात स्थानापन्न होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने