आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये खिसमस (नाताळ)सण उत्साहात साजरा
नगर-सावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेत आज पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ख्रिसमस(नाताळ) हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला असून त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी सभिनय नृत्य करून गायनगीत सादर केले.
शालेय वयात विद्यार्थ्यांना धार्मिक सण,उत्सवांची माहिती अवगत व्हावी व त्यांच्यामध्ये आदर,सन्मान,आत्मविश्वास, ऐक्य, समानता व सर्वधर्मसमभाव वृत्ती वृध्दिगत होण्यासाठी शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात.याच उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मदतीने,विद्यार्थ्यांनी खिसमत्त सणाचे महत्त्व असलेल्या येशू खिस्त व त्यासंबंधातील सुंदर देखावा सादर केला.
तसेच लहान मुलांचे विशेष आकर्षण असलेल्या सांताक्लॉजची वेशभूषा सौ.गो
हेर कोमल यांनी करून विविध भेटवस्तूंचे वाटप केले.तर शाळेची विद्यार्थिनी कु.पाटील रिचा हिने नाताळ सणाचे महत्व विशद केल,त्याचप्रमाणे पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सांता क्लॉजसोबत नृत्य करून या खिसमस सणाचा आनंद लुटला.
चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे पाटील, कार्यकारी विश्वस्त अॅड. विश्वासराव आठरे पाटील व सर्व विश्वस्त यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन खिसमस सणासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.पंडित वृतिका यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक,प्राथमिक विभाग प्रमुख,समन्वयक,पर्यवेक्षिका,सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com