एम.आय.डि.सी मधील ॐ शिव गोरक्ष योगी आस्थानामध्ये संतांचा मेळा संपन्न
नगर-मधील निंबळक बोल्हेगाव रोड,एसआयडिसी येथील ॐ शिव गोरक्ष योगी आस्थाना मध्ये दत्त जयंती उत्सवा निमित्त संतांचा मेळा आयोजित करण्यात होता. यामध्ये राज्यातून योगी महंत सोमवार नाथजी महाराज,मुदगड,योगी गणेश नाथजी महाराज,नाशिक,योगी पीर शामनाथजी महाराज,सोनारी, योगी पीर अजय नागजी महाराज,परंडा,योगी पीर नारायणनाथजी महाराज,सायखेडा,योगी मांगीनाथजी महाराज,
हरियाणा,योगी समशेरनाथ महाराज,धुळे,योगी सेवकनाथजी महाराज,नाशिक,योगेश महाराज,हरिद्वार,योगी दीपक नाथजी महाराज,नेवासा,योगी ऋषिनाथजी महाराज नेवासा,शामनाथजी बापू,त्रंबकेश्वर ,अवघडपीर रविनाशजी महाराज,मालेगाव,मठाधिपती अशोक भाऊ महाराज,नगर,अवघडपीर सागरनाथजी महाराज,
कजबूज,नाथभक्त सुशांत भाऊ,श्रीरामपूर,चंदू मामा,चांदोरी, पंकज भाऊ,चांदोरी, शैलेश भाऊ,येवला,आप्पा भाऊ, नाशिक,उत्तम भाऊ,निफाड गोरख भाऊ,देवळा, तुषार भाऊ,शहापूर,पांडूभाऊ,सोहमनाथजी,त्रंबकेश्वर सह अनेक संत महंत उपस्थित होते
प्रथम नागापूर येथील रेणुका माता मंदिरापासून ते मठापर्यंत तीन किलोमीटरची संतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये रामराज्य ढोल पथक,बँन्ड पथक,संबळ वादक,श्री गोरक्ष योगी आस्थानचे अश्व राणा यांचे नृत्य,कळसदारी महिला सह सचिनभाऊ जगताप,नगरसेवक कुमारभाऊ वाकळे,अविनाश कोतकर आदींसह अनेक मान्यवर व हजारो भाविक भक्त सहभागी झाले होते. तर जागोजागी मिरवणुकीतील संत महंतांवर जेसीबीने व भाविक पुष्पवृष्टी करत होते,मिरवणुकीत श्री शक्ती,बेटी बचाओचे फलक होते,तर नाथांची गाणी साउंड वर वाजवली जात होती
मिरवणूक मठात पोहचल्यावर मठाधिपती अशोक भाऊ महाराज यांनी सर्व संतांची पाद्यपूजा केली व त्यांचा सन्मान केला. यावेळी पाळण्यामध्ये सुंदर अशी त्रिमूर्ती बाल मूर्ती ठेवण्यात आली होती. तर 108 हवन कुंडाची ३ दिवसीय दत्त यागाची सांगता करण्यात आली व महाप्रसाद संपन्न झाला तसेच दिवसभर विविधकार्यक्रम संपन्न झाले,रात्री उशिरापर्यंत भाविक भक्त दर्शनासाठी येत होते
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com