Top News

बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक

 बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक

बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक

 




शिर्डी । दर्शक :-


भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. बनावट दर्शन पास देत एजंट साई भक्तांची फसवणूक करत आहे. याप्रकरणी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंत्राटी कर्मचारी सागर रमेश आव्हाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



साईबाबा मंदिर संस्थानने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले आहे. यामुळे जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे; त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असताना देखील बनावट पास तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.



या प्रकरणी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरून साई साईसंस्थानच्या प्रकाशन विभागातील कंत्राटी कर्मचारी सागर रमेश आव्हाड याच्याविरोधात विविध कलमान्वये शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास होण गरजेचं आहे. अशी मागणी होत आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने