पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरले गणित-विज्ञान प्रदर्शन
नगर - दर्शक :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा व गणिताची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये गणित-विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्प सादर करुन उपस्थितांना अवाक केले.
विविध प्रकल्प सदर करुन विद्यार्थ्यांनी त्याची माहिती दिली. या प्रदर्शनात इयत्ता पहिली पासून ते इयत्ता नऊवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका नलिनी काटरपवार, डायना सत्राळकर, वैष्णवी खरवडकर, हिना शेख, शलाका सराफ, ऋतिका ढेकळे, ऐश्वर्या पिल्ले यांनी विद्यार्थ्यांना उपकरणे तयार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनात तयार केलेल्या उपकरणांचे परीक्षण किरण कालरा, रोहित रामदिन, भावेश मिश्रा आणि अजिमा शेख यांनी केले. तर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन सादर केलेल्या प्रकल्पाचे कौतुक केले.
शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये संशोधकवृत्ती निर्माण झाली पाहिजे. विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातूनच भविष्यातील वैज्ञानिक घडतील. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून प्रोत्साहन मिळणार असल्याचे स्पष्ट करुन,
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहा आणि ती स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका मीनल राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या उपप्राचार्य शगुफ्ता काझी, आशुतोष नामदेव सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com