Top News

Residential Highschool | शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे ध्येय ठेवावे-संचित जाधव

 रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

Residential Highschool | शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे ध्येय ठेवावे-संचित जाधव







नगर- स्पर्धेच्या युगात आपण मागे पडू नये, यासाठी शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांचे ध्येय ठेवावे. स्पर्धा परीक्षेची तयारी चार सुत्री पद्धतीने कशी अमलात  आणावी . ध्येयाला नियोजनाची जोड हवी, ध्येय प्राप्त करण्यासाठी सातत्य कायम असावे. असे मत रेसिडेन्सी हायस्कूलचे माजी विद्यार्थी डी.वाय.एस.पी C.I.S.F(इस्रो श्रीहरीकोट) संचित जाधव यांनी व्यक्त केले.



       रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात  पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे ,सचिव ॲड.विश्वासराव आठरे, ॲड. दीपलक्ष्मी म्हसे,जी.डी खानदेशे, सिताराम खिलारी, जयंत वाघ, मुकेश मुळे , ॲड.माधवेश्वरी ठुबे,अरुणाताई काळे, कल्पना वाईकर, सुभाष भोर आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रकला, हस्तकला, विज्ञान, सलाड डेकोरेशन, पुष्परचना ,रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.


           यावेळी बोलताना ॲड.विश्वासराव आठरे म्हणाले की, बौद्धिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासाकडे विद्यालयाचे लक्ष केंद्रित आहे. सर्वसामान्य मुलांना घडवण्याचे विद्यालयाचे मोठा वाटा आहे .विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण दडलेले असतात ते शिक्षक व पालकांनी ओळखता आले पाहिजे .विद्यार्थ्यांनी मिळालेले संधीचे सोने करण्याचे त्यांनी सांगितले .


          यावेळी जयंत वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या अग्रक्रमांचा उल्लेख करताना राष्ट्रीय राज्य पातळीवरील परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व संस्थेच्या कार्याचा आढावा विशद केला.



       सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र देवडे, प्रा. प्रशांत ढगे यांनी केले .कार्यक्रमाचे आभार डी.सी.म्हस्के यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डी.जी.वांडेकर ,प्रा. बळीराम सातपुते, प्रा. व्ही.एस दारकुंडे आदींनी परिश्रम घेतले

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने