जिद्द, चिकाटी, आवड, संयम व एकाग्रता हे गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजेत - अभिनेत्री कु. गौरी कुलकर्णी

 समर्थ विद्यामंदिर (प्राथमिक विभाग) सांगळे गल्ली शाळेचे स्नेह संमेलन संपन्न

जिद्द, चिकाटी, आवड, संयम व एकाग्रता हे गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजेत - अभिनेत्री कु. गौरी कुलकर्णी


नगर : दर्शक । 
 शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा स्नेहसंमेलन आयोजित करत असते. या वर्षी शाळेने गणित-विज्ञान कला प्रदर्शन, हस्तलेखन, मासिक तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.



         या कार्यक्रमाला अभिनेत्री कु. गौरी कुलकर्णी अतिथी म्हणून तर संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी कु. गौरी कुलकर्णी यांनी आपल्या जीवनप्रवासाविषयी तसेच अभिनय क्षेत्रातील अनुभव विशद केले.





 जिद्द, चिकाटी, आवड, संयम व एकाग्रता हे गुण विद्यार्थ्यांनी अंगी स्वीकारले पाहिजेत, तरच यश प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी आल्यानंतर स्वतःला शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदर्शन, हस्तलेखित मासिक तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाबाबत विद्यार्थ्यांचे, शाळेचे व संस्थेच्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.


        कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता व गुणवत्ता वाढीसाठी संस्था व शाळेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्याबाबत मनोगत व्यक्त केले.


गेल्या पन्नास वर्षांत संस्थेने केलेल्या कार्याचा प्रगतीचा आढावा, शाळांची गुणवत्ता, भौतिक सुविधा व उपक्रम याबाबतचा वार्षिक अहवाल संस्थेचे सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर यांनी सर्वांसमोर मांडला.


            शाळेने वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले यश व विविध उपक्रम शाळेच्या अहवालात मुख्याध्यापिका अजय महाजन यांनी विशद केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजय महाजन यांनी केले, तर आभार भगवान जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती लीना बंगाळ व श्रीमती शीतल जऱ्हाड यांनी केले. अतिथींचा परिचय शिक्षक प्रतिनिधी सौ. सविता येवले यांनी करून दिला. कला प्रदर्शनाचे नियोजन श्री. संदीप गायकवाड यांनी तर गणित-विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन सवतीपा सप्तर्षी यांनी केले.


           कार्यक्रमावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, चेअरमन विकास सोनटक्के, व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य सौ. संध्या कुलकर्णी, सदस्य स्वप्निल कुलकर्णी, मुख्याध्यापक किशोर कानडे तसेच बहुसंख्य पालक उपस्थित होते.


          कार्यक्रमात प्रमुख अतिथी कु. गौरी कुलकर्णी यांच्या हस्ते शाळेचे आदर्श मुख्याध्यापक अजय महाजन तसेच आदर्श शिक्षक सौ. वैशाली मगर व श्री. शंकर निंबाळकर यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या