Padamsali Samaj | पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळा प्रकरणी उपोषण

  Padamsali Samaj | पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळा प्रकरणी उपोषण 

Padamsali Samaj | पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळा प्रकरणी उपोषण






    Padamsali Samaj |  नगर : दर्शक ।  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम व इतर साथीदार याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यास पोलीस प्रशासन हे मोठ्या प्रमाणात टाळाटाळ करीत आहे. त्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सभासद उपोषनास बसले  





         या उपोषणात  राहुल गाजुल,नरसिंग वडलाकोंडा,अभय बुरुगुलधनंजय सुंकीकृष्णा चिट्ट्याल योगेश म्याकलओंकार रामगिरीश्रीनिवास वंगारशंकर कोंडा ,नर्मदा कोंडाविष्णू बोललीसत्यभामा हिरावती रमेश बल्लाळवैभव अरकल,शंकर वंगारमोहन चेन्नुरसुरेश रंगा ,सूर्यकांत श्रीपतमहेश गुरुडशंकर अन्नलदासविष्णू दुव्वा,मोहन बौज्जासंजय आकुबत्तीनपद्मा कोंडाअंबादास मादासपूजा चिट्टयाल ,अनिता अल्लीरत्नमाला आडेप,स्वाती सब्बनअनिता गुंडू ,बालमनी कोंडा ,मेघा बोगासुजाता कंडेपेल्लीगुरुदत्त जेटलागणेश दासरबालाजी दिकोंडाविजया दावरशेट्टी ,पद्मा सब्बन बालमनी एकलदेवी,मन सुनंदा तिरमल राजेंद्र तिरमलबालाजी कोक्कुल,अशोक एकलदेवीदेवीदास जक्कल आदी सहभाग आहे 




        पद्मपुरी गृहनिर्माण संस्थेच्या नागरीकांचे निवा-यांचे ठिकाण २२० सभासदांचे प्लॉट बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा करार या मास्टर माईडने करून हजारो समाजातील लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील संस्थेचे सुमारे १ हे. २०आर जागा अंदाजे ७ कोटी ५० लाख रुपये किंमतीची जागा अगदी ४२ लाख ९० हजार या कवडीमोल भावाने विकण्याचा प्रयत्न करून करोडो रुपयांचा घोटाळा करणा-या व समाजातील लोकांना बेघर करणा-या समाजद्रोही मनोज लक्ष्मण दुलम व इतर यांचे विरुध्द गुन्हा दाखल करणेकामी पद्मपुरी सोसायटी सभासदांनी  पोलीस अधिक्षक साहेबअहिल्यानगर यांचेकडे अर्ज दाखल केलेला होता. 




            सदर अर्ज हा तोफखाना पोलीस स्टेशन यांचेकडे कारवाई करण्यासाठी पाठविण्यात आला होता. परंतु आजपर्यंत पोलीस प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणुन पोलीस प्रशासनावर राजकिय पक्षाचा दबाव असल्यामुळे त्याचे विरुध्द गुन्हा दाखल होत नाही.यासाठी हे उपोषण आहे 





              समाजातील गोरगरीब कष्टकरी विडी विनकामगार सभासदांचे ४००-४०० स्क्वे. फुटाचे जमीनींचा बेकायदेशीर व्यवहार करुन विडी कामगारांचे फसवणुक केल्याने त्याचे विरुध्द तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे या मागणी करीता नियोजीत पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद कुटूंबासह आजपासुन बेमुदत उपोषणासाठी पोलीस अधिक्षक कार्यालय समोर विडी कामगारांचे आमरण उपोषण  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या