Sindhi Samaj Nagar | सिंधी जनरल पंचायत आयोजित वॉकथॉन स्पर्धेला प्रतिसाद

 Sindhi Samaj Nagar | सिंधी जनरल पंचायत आयोजित वॉकथॉन स्पर्धेला प्रतिसाद

Sindhi Samaj Nagar | सिंधी जनरल पंचायत आयोजित वॉकथॉन स्पर्धेला प्रतिसाद



 Sindhi Samaj Nagar |  नगर : दर्शक । 

येथील सिंधी जनरल पंचायत, ट्रस्टच्या वतीने वर्षअखेरीचे निमित्त साधून सिंधी समाजासाठी आयोजित केलेल्या 'सिंधी एकता दौड' अर्थात वॉकथॉन- 2025 स्पर्धा काल मोठ्या उत्साहात पार पडली. यात लहान मुले, तरुण-तरुणी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 



भुतकरवाडी येथील सिंधू मंगल कार्यालयापासून ताठेमळा, पंपिंग स्टेशन रोड मार्गे कराळे हेल्थ क्लब व पुन्हा सिंधू मंगल कार्यालय असा अंदाजे पाच किलोमीटरची ही स्पर्धा होती. प्रारंभी सकाळी 6:45 वाजता स्पर्धेत नावनोंदणी केलेल्या स्पर्धकांनी आपली उपस्थिती नोंदविली. त्यानंतर सर्वांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्मअप व झुंबा केला. 




नंतर मुख्य मंचावरील सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष महेश मध्यान, सुरेश हिरानंदानी, जय रंगलानी, प्रदीप आहुजा, राजकुमार गुरनानी, सुनील बजाज, प्रेम बजाज, कपिल किंगर, विनोद कुकरेजा, इंदर बजाज, प्रा. चेतन नवलानी आदी मान्यवरांसमवेत राष्ट्रगीत पार पडले. त्यानंतर मान्यवरांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करून दिली.     




स्पर्धेचा घोषवाक्य “एकता ही सम्मान है, शक्ती है और पहचान है” असा होता. ही स्पर्धा स्वास्थ्य, एकता व सामाजिक बांधिलकीला समर्पित होती. स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना पदक देऊन गौरविण्यात आले तसेच याप्रसंगी पाच भाग्यवंत स्पर्धकांना विशेष पारितोषिके देण्यात आली. 




      पहिल्यांदाच आयोजित स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता सिंधी जनरल पंचायततर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे याप्रसंगी घोषित करण्यात आले तसेच वर्षभर नवनवीन उपक्रम आयोजित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.  



     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधी जनरल पंचायतचे सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच प्रा. चेतन नवलानी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय गुरनानी, जितेश माखीजा, राहुल पोपटानी आदि सह अनेक तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.   शेवटी महेश मध्यान यांनी सर्व स्पर्धकांचे, समाजबांधवांचे तसेच स्पर्धेला लाभलेल्या प्रायोजकांचे विशेष आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या