Top News

आंदोलनामुळे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार नाहीत – शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन

 19 जानेवारीपासून शिक्षण सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनास जाहीर पाठिंबा


आंदोलनामुळे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार नाहीत – शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन






नगर : दर्शक 
अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच अशोकभाऊ इंग्लिश मीडियम स्कूल, नगर येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित होते. बैठकीत शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर सुरू असलेल्या विना चौकशी व विनापरवानगी अटक सत्राबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.


शालेय शिक्षण विभागातील अधिकारी सध्या प्रचंड मानसिक दबावाखाली काम करत असून, सुरू असलेल्या कारवायांमुळे त्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. याचा थेट परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. गृह विभागाने या बेलगाम अटक सत्राचा तातडीने फेरविचार करावा तसेच दोष सिद्ध होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची स्पष्ट धोरणात्मक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.


       या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र राज्य शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने 19 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला असून, या आंदोलनास अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचे पत्र जिल्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर व अधीक्षक संध्या भोर, कार्यालय अधीक्षक महावीर दोधाड यांना सादर करण्यात आले.


        यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब बोडखे, भाजप शिक्षक सेलचे अध्यक्ष वैभव सांगळे, शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब गडदे, शिक्षक परिषदेचे खजिनदार प्रसाद सामलेटी, उपाध्यक्ष दिलीप रोकडे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे उद्धव गुंड, कला अध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक डोळसे यांच्यासह प्रशांत सुरसे, प्रशांत मस्के, पानसरे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


      दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्याशी झालेल्या चर्चेत संघटनेने आंदोलनास पाठिंबा देत असतानाच जिल्ह्यातील कोणत्याही मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार आंदोलनामुळे उशिरा होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी ठाम भूमिका मांडली. त्यावर शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानत जिल्ह्यातील कोणाच्याही पगारात विलंब होणार नाही, सर्व पगार तातडीने अदा करण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन दिले..

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने