टिव्ही.सेंटरच्या दत्त मंदिरात महाप्रसाद संपन्न
नगर- या कलियुगामध्ये नामस्मरण हेच साधन आहे.हे सर्व थोर संतानी सांगितले आहे.आपल्याकडे भगवान श्री दत्तात्रेय गुरूंची मोठी अवतार परंपरा असून त्याद्वारे जनउध्दारणाचे कार्य सतत चालु आहे.या परंपरेत अनेक संताची मांदियाळी असून आजच्या परिस्थितीत नामस्मरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जी प सदस्य सचिन भाऊ जगताप यांनी केले.
सावेडीतील टिव्ही सेंटर,येथील मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव निम्मित आज मंदिर प्रांगणात महाप्रसाद भंडारा चा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावे विघ्णहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेशभाऊ सोनवणे पाटील यांनी ह्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आले.
यावेळी मोठया संख्नेने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला , अनेक मान्यवर व परिसरातील ऑफिस कर्मचारी, अधिकारी व भाविक मोठ्या संख्नेने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी विघ्नहर्ता प्रतिष्टान,सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, मनपा अग्निशामक दल,सावेडी यांच्या यांच्या कार्यकर्त्यांनी,व्यापाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com