Top News

प्रयास ग्रुपची मासिक सभेत रजनीताई मनोज भंडारी यांचा सत्कार

 प्रयास ग्रुपची मासिक सभेत रजनीताई मनोज भंडारी यांचा सत्कार 

प्रयास ग्रुपची मासिक सभेत रजनीताई मनोज भंडारी यांचा सत्कार





               नगर- येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला प्रयास ग्रुपची मासिक सभा चिंतामण रामचंद्र देशमुख येथे संपन्न झाली.यावेळी ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, दादि नानी ग्रुपच्या अध्यक्षा  जयाताई गायकवाड,सावेडी ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी,वैजयंती देशमुख,योगेश देशमुख,उषा सोनी,मयुरेश देशमुख ,श्रीदेवी देशमुख,चेतन कांबळे,हिरा शहापुरे,रेखा फिरोदिया,जयश्री पुरोहित,सल्लागार विद्या बडवे,मेघना मुनोत,उषा सोनटक्के आदींसह मोठ्या संख्नेने महिला  उपस्थित होत्या.


 

            प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या अध्यक्षा सौ.रजनीताई मनोज भंडारी यांचा वाढदिवसा निम्मित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी कार्यक्रमात विविध गेम,प्रश्नमंजुषा यांनी कार्यक्रम भरपूर रंगला व महिलांनी खूप बक्षीस मिळवली.मेघना मुनोत व मोना बजाज यांनी  बौद्धिक गेम घेतले व सूत्रसंचालन केले.


  

            यावेळी योगेश देशमुख म्हणाले सोन्यातील गुंतवणूक हि कायम फायदेशीर आहेआपल्याकडे लोक वेगवेगळ्या ठिकाणी भांडवल गुंतवतात.यापैकी सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानले जाते.


सोन्याची नाणी आणि दागिन्यांची सर्वाधिक खरेदी केली जाते.तुम्हाला भविष्यासाठी फक्त सोन्यातच गुंतवणूक करायची असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.सोन्याची प्रत्येक गुंतवणूक वेगळी असते आणि त्याचे फायदेही वेगळे असतात.असेही ते म्हणाले.

 

           रजनीताई  भंडारी म्हणाल्या सावेडी शाखेची अध्यक्ष झाल्यावर अनेक उपक्रम राबविण्यात आले,आज माझ्या वाढदिवसा निम्मित सत्कार करून शुभेछया दिल्या याबद्दल मी आभारी आहे

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने