Nagar Divyang | दिव्यांगाचा 5% निधी वाटप करावा ; अन्यथा जागरण गोंधळ : जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे
नगर - अनेक वर्षापासून बऱ्याच ग्रामपंचायतीनी, शासन निर्णय २०१६ नुसार मिळणारा दिव्यंगाचा हक्काचा ५ टक्के निधि आजतागायत वाटप केलेले नाही. २६ जानेवारी पूर्वी दिवंग्यांच्या हक्काचा असणारा ५ % निधी वाटप करावा ,अन्यथा जिल्हा परिषद आवारात भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी अहिल्यानगर जिल्हाचे सर्व दिव्यांग बंधू वा भगिनींना बरोबर घेऊन पदाधिकारी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे सर, महिला जिल्हा अध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा संघटक गणेश लष्करे, संदीप शिंदे तसेच सर्व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आला.
2016 नुसार मिळणारा दिव्यांग हक्काचा ५ % दिव्यांग निधी मिळण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी यांनी वारंवार पत्र व्यवहाराच्या माद्यमातून आपल्या कार्यालयाशी संपर्क केला असता, आम्हाला लेखी स्वरूपाची आश्वासने देऊनं फक्त सहानभूती दाखवण्याचे काम करण्यात आले. प्रत्यक्षात दिव्यांगाना ना ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालय असो अथवा तलाठी कार्यालय, कोणत्याही प्रकारचा मान सन्मामान मिळत नसल्याचे खंत आजही जाणवते, गेले अनेक वर्ष आम्ही फक्त पत्र व्यवहारांच्या माध्यमातून आम्हाला कधी न्याय मिळेल तेच समजत नसल्याने, तसेच आमच्या दिव्यांग बंधू व भगिनींकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने,
आम्ही नाइलाजास्तव जिल्ह्यातील दिव्यांग बंधू व भगिनी समवेत ग्रामसेवकांच्या व प्रशासनाच्या कारभरावर उदास होऊंन जिल्हा परिषदेच्या कार्यालय आवारात दिनांक ०3 फेब्रुवारी २०२४ रोजी कोणतीही पूर्व सुचना न देता जागरण गोंधळ घालणार आहोत. आमच्या दिव्यांगांच्या जीवितास काही धोका झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे आणि दिव्यांग संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला.
यावेळी येरेकर साहेब यांनी निवेदनबाबद सकारात्मक चर्चा केली व सदर निवेदनावर संबंधित ग्रामपंचायतीना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील व दिव्यांगाचा नेहमीच सन्मान केला जात आहे, जर कोणत्याही कार्यालयात दिव्यांगाना व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर तशी तक्रार आमच्याकडे करावी, संबंधितनावर करावाई केली जाईल.अश्या प्रकारचे आश्वासन दिले त्याबद्दल आम्ही साहेबांच्या सकारात्मक चर्चेबाबद समाधानी आहोत.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com