Sitaram Sarda School | हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात उपक्रम
नगर : दर्शक ।
नगर - मार्च 2025 एसएससी परीक्षेसाठी तसेच विद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत आम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी करणार नाही. तसा विचार देखील परीक्षेच्या आधी करणार नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून पूर्ण पेपर लिहू. पालकांच्या कष्टाची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी आम्ही कष्ट करूनच, अभ्यास करूनच परीक्षा देऊ. अशी शपथ हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या जोशात घेतली. या शक्तीचे वाचन पर्यवेक्षक गोविंद धर्माधिकारी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली कॉपीमुक्त परीक्षेची शपथ. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. मंगला भोसले, ज्येष्ठ शिक्षक अशोक डोळसे, दीपक आरडे, सौ. लगड, आनंद जोशी, नितीन केणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व सांगताना परीक्षा ही केवळ आपण केलेल्या कष्टाचे परीक्षण करण्यासाठी असते. त्यामुळे परीक्षेत कोणताही गैरप्रकार करून आपण स्वतःचीच फसवणूक करीत असतो. ही फसवणूक आपणास आयुष्यभर त्रासदायक ठरते. असे मनोगत मुख्याध्यापिका श्रीमती भोसले यांनी व्यक्त केले.
एसएससी परीक्षेत कशा पद्धतीने उत्तरपत्रिकेत उत्तर लिहायची, पेपर देण्यासाठी आवश्यक साहित्य व एसएससी बोर्डाचे नियम यावेळी विद्यार्थ्यांना दीपक आरडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता खामकर यांनी केले तर आभार सौ.वैशाली पिसे यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com