Savedi | अय्यप्पा मंदिरात मकर विल्लकु उत्सवात मंडल महापूजा संपन्न

 Savedi | अय्यप्पा मंदिरात मकर विल्लकु उत्सवात मंडल महापूजा संपन्न 

Savedi | अय्यप्पा मंदिरात मकर विल्लकु उत्सवात मंडल महापूजा संपन्न


Savedi |  नगर : दर्शक । 

             सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात चालू असेलेल्या ६० दिवसांच्या मकर विल्लकु उत्सवात आज  मंडल  महापूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यानिमित्ताने दिवसभरअय्यप्पा सेवा समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते  अशी माहिती अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी दिली आहे.


 


            दक्षिण भारतीयासह महाराष्ट्रातील भाविकाची श्रद्धा असलेले अय्यप्पाचे मंदिर केरळ मधील शबरीमळा येथे असून त्या मुख्य उत्सवाचा धर्तीवर ६० दिवसांचा मकर विल्लकु उत्सव नगर मध्ये केला जातो.या उत्सावाच्या ४१ व्या दिवशी मंडल पूजा केली जाते.



यानिम्मित पहाटे महागणपती हवन,पूजा करण्यात आले तर दुपारी महिला भाविकांनी फुलांच्या माळा तयार केल्या व पुरुष भाविकांनी मंदिर सजविले,संध्याकाळी प्रोफेसर कॉलनी जवळील महालक्ष्मि मंदिर ते अय्यप्पा मंदिर अशी सावेडी तून भव्य शोभायात्रा(तालापोल्ली) काढण्यात आली होती.



  महिला मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली ताट व त्यामध्ये अर्धा नारळ दिवा प्रज्वलित करतात.ही तालापोल्ली पाहण्यासाठी नागरिकानी  गर्दी केली होती.मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी सजविण्यात आला व दीपआराधना करण्यात येऊन  देवाची आरती नंतर पुष्पभिषेक करण्यात आला.



 

          यावेळी डॉ सोमणीउद्योजक  नरेंद्र फिरोदिया,राजाभाऊ मुळे,अनिल जोशी,बाबासाहेब वाकळे,अशोक गायकवाड,समितीचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले,सचिव वसंत सिंग,उपाध्यक्ष राजू लक्ष्मण,सेक्रेटरी के.उदयकुमार,खजिनदार पी.सत्यान नायर,पी सी श्रीधरन,सुदर्शन मेनन,बेबी कुंजूरमन,वेणुगोपाल,रवी नायर आदींसह मोठया संख्येने हजारो भाविक उपस्थित होते.


 

       नंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आले.यावेळी कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थित होते.शेवटी हरी वरासम होऊन मंडल पूजा उत्सवाची सांगता झाली.अय्यप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या या दोन महिन्याचा उत्सवाची सांगता १४ जानेवारीस मकर पूजा उत्सवाने होणार आहेतत्पूर्वी हा मंडल महापूजा हा मोठा उत्सव असतो. 

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या