Top News

नगर महापालिका : महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांनी राजकीय समीकरणे बदलली

 नगर महापालिका : महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांनी राजकीय समीकरणे बदलली

नगर महापालिका : महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांनी राजकीय समीकरणे बदलली




नगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, विरोधकांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाची परंपरा कायम राखत भाजपने महापालिकेच्या निवडणुकीतही विजयाचा बिगुल फुंकला आहे.


निवडणूक प्रक्रियेच्या प्रारंभीच महायुतीच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे महायुतीची ताकद अधोरेखित झाली असून, आगामी निवडणुकीत भाजपचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


प्रभाग क्रमांक सातमधून पुष्पां अनिल बोरुडे, तर प्रभाग क्रमांक सहामधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे  हे भाजपचे तीन उमेदवार कोणताही सामना न होता विजयी ठरले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)नेही निवडणुकीत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून प्रकाश भागानगरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.


Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने