Top News

Nagar Election | मी महानगरपालिका निवडणुकीची पूर्ण जबाबदारी घेतली असून निवडणुकीत पूर्ण लक्ष देणार : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

 Nagar Election | मी महानगर पालिका निवडणुकीची पूर्ण जबाबदारी घेतली असून निवडणुकीत पूर्ण लक्ष देणार : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

Nagar Election | मी महानगरपालिका निवडणुकीची पूर्ण जबाबदारी घेतली असून निवडणुकीत पूर्ण लक्ष देणार : पालकमंत्री राधाकृष्ण विखे



 Nagar Election |  नगर : दर्शक । 

मी महानगरपालिका निवडणुकीची पूर्ण जबाबदारी घेतली असून निवडणुकीत पूर्ण लक्ष देणार आहे. आता निवडणुकांची पद्धत व माध्यमे बदलले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त आपापल्या मतदारसंघातील नागरिकांशी संवाद ठेवावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फेक नॅरीटिव्ह, खोटे रील द्वारा विरोधक अपप्रचार करतील.


मात्र युतीच्या उमेदवारांनी ठामपणे आपली विकासात्मक भूमिका व पक्षाची भूमिका मतदारांसमोर मांडावी. या निवडणुकीत युतीला शंभर टक्के यश मिळणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या निवडणुकीत युती सर्वात मोठा विजय मिळवत नवा इतिहास रचेल, अशी खात्री राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी वक्त करून युतीचे उमेदवार प्रकाश भागानगरे व कुमारसिंह वाकळे हे बिनविरोध निवडून आल्याने युतीच्या विजयाची नांदीच झाली असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला.


नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरवारी नगरमध्ये झाली. यावेळी आ.संग्राम जगताप, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, 


राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, समन्वयक विनायक देशमुख, सुवेंद्र गांधी, बाबासाहेब सानप यांच्यासह युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश भागानगरे व कुमारसिंह वाकळे हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने